बालपण - शिवा बाजीराव खंडारे
* बालपण *
बालपणीच्या चाळ्याचे मज स्मरण आज झाले
प्रसंग सर्वे बालवयाचे डोळ्यासमोर आले
विटीदांडू,भोवरा,खेळभांड्या
सोबतच रंगेबिरंगी कंचे होते
इतकंच काय सांगावं तर
मित्रांचे भांडण-तंटे होते
भांडणाचा अबोलेपणा कमाल एक तास असायचा
यातही मित्र असा धक्का बुक्की करत बसायचा
धक्का बुक्की संपून झाल्यावर एकत्रच बसायचे
दुसऱ्या तासाला तेच मित्र बोलण्यात मग्न दिसायचे
भोवतालचे दुःख वेदना काहीच कळत नसायच्या
आपल्याच विश्वात रमतांना वाटा खूप असायच्या
सख्यांसोबत खेळत होतो आपुल्याचं धुंदीत
ना कसलीच काळजी होती कोणत्याही मंदीत
खाणे आणि खेळणे हा एकमेव धर्म होता
विनाकारण चा उपद्व्याप हा साहजिकच होता
बालवयाचे बालपण मी भरभरून जगलो
याच बालपणातुन मी खूप काही शिकलो
असंख्य कारणं होती तेव्हा काम टाळण्यासाठी
मनमुराद स्वातंत्र्य होते तेव्हा धांदला करण्यासाठी
जबाबदारीच्या ओझ्याखाली आज दिवस पालटत आहेत
चेहरा आहे तजेलदार पण मन मात्र घुसमटत आहे
थोडी जरी चूक झाली आता टोचून बोलल्या जाते
तेव्हा तेव्हा लहानपणाची आठवण मात्र येते
कवितेतच आता मी बालपण शोधतो आहे
हरवलेले दिवस आज काव्यात अनुभवतो आहे
बालपणाची थोरवी अशी काव्यात सांगता संपत नाही
बालवयाचेच अनमोल दिसं याची देईल कोणीही ग्वाही.
कवी - शिवा बाजीराव खंडारे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत