New

सोशल मीडिया आणि आजची तरुण पिढी - शिवा बाजीराव खंडारे


सोशल मीडिया आणि आजची तरुण पिढी



अत्याधुनिक स्मार्टफोन आणि इंटरनेट च्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षात वापरकर्ते संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असून दिवसेंदिवस हा आलेख वरचढ स्वरूपाचा असल्याचा आपल्याला दिसून येतो. सोशल मीडिया म्हणा अथवा इंटरनेट ने म्हणा मानवी जीवनात एक क्रांती घडवून आणलेली आहे.या क्रांतीचे काही फायदे व काही तोटे असतील यात काही दुमत नाही. मात्र या बाबींवर न बोलता वर दिसत असलेल्या छायाचित्रा वर काहीतरी लिहावंसं वाटलं म्हणून लिहितोय.


सोशल मीडिया हा शब्द आता सर्वांना परिचित असा शब्द झालेला आहे. पृथ्वीतलवार क्वचित असे लोक असतील ज्यांना हा शब्द परिचयाचा नसेल.

आपण सहजगत्या या शब्दाचा उच्चार जरी करीत असलो तरी या शब्दामध्ये असंख्य प्रकारचे घटक आहेत ज्यांचा परिचय देता देता खूप वेळ निघून जाईल मात्र पूर्ण सांगणं होणार नाही.थोडक्यात, फेसबूक, व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम,ट्विटर, टेलिग्राम,युट्यूब व यांसारखे अनेक कितीतरी अँप्स चा सोशल मिडिया मध्ये समावेश होतो.

ज्या अँप्स नी इंटरनेट च्या साहाय्याने मोबाईल द्वारे मानवी जीवनात एकप्रकारे क्रांती घडवून आणली. या क्रांतीचा फायदा आज बहुसंख्य लोकांना झालेला आहे. कित्येक लोक आज सोशल मीडियावर आपला अमूल्य वेळ तासनतास वाया घालवतात यातील काही कामाच्या निमित्ताने तर काही जण काम टाळण्यासाठी तर काही जण वेळ वाया घालवण्यासाठी वरीलपैकी प्रकार कोणताही असो मात्र सोशल मिडिया वर वेळ घालवतात हें आपन नाकारू शकत नाही आणि हे त्रिकाल सत्य आहे. आणि या वेळ वाया घालवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते.कोरोना महामारी च्या या काळात देशात lockdown सारखी परिस्थिती असल्यामुळे घरच्या बाहेर जाणे शक्य नाही म्हणून विद्यार्थी वर्ग,तरुण मंडळी, वृद्ध घरी बसून वेळ वाया घालावण्यासाठी आज सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. Lockdown च्या या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मोबाईल विकत घेतले. नोकरी करत असलेल्या लोकांसाठी work from Home सुरू झाले. बघता बघता मोठ्या प्रमाणात मोबाईल ची गरज निर्माण झाली व आज प्रचंड प्रमाणात हे सर्व प्रकारची माणसं मोबाईल वापरू लागलीत. महामारी अगोदर सुद्धा मोबाईल वापरणं साहजिकच होत मात्र lockdown मध्ये एकेकाळी सोशल मिडिया चा,मोबाईल चा वापर न करणारे लोक देखील आज मोठ्या संख्येने मोबाईल वापरत आहे. ग्राहकांची,सोशल मीडिया वापरकर्त्यांचीसंख्या लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरुवातीस स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवून व्यापारी वर्गाने सर्वसामान्य माणसाला, तरुणांना, लहान मुलांना इंटरनेट व सोशल मीडिया चे भयंकर व्यसन जडवले. व आज हे व्यसन जडवून मोठ्या प्रमाणावर इंटरनेट/ Data चे भाव वाढवलेत. दहा रुपयांपासून Rechage सुरू करून आज हजारो रुपयांचे Recharge करण्यासाठी या टेलिकॉम कंपन्यांनी सर्वसामान्य माणसांना मजबूर केले.आज जगात सर्वात जास्त प्रमाणात सोशल मिडिया वापरणारे लोक आपल्या भारत देशातच आढळतात.आणि या मध्यें प्रामुख्याने आजची तरुण पिढी चा समावेश आहे. भरपूर वेळ असल्यामुळे तासनतास मोबाईल वर PUBG, Free-Fire, Bike Racing व यांसारखे इतर हजारो games खेळणारे तरुण आपलेच बहाद्दर आहेत.Games खेळताना बाहेरच्या जगाचं काहीचं भान त्यांना नसतं. इतकंच काय तर व्हाट्सअप्प वर वेगवेगळ्या moods चे status ठेवण्यात आजचा तरूण व्यस्त झाला आहे.कधी Romantic तर कधी broken heart,धार्मिक,शैक्षणिक,songs movie scens सारखे status तर हमखास आपल्याला दिसून येतात. गंमत इतकीच नाही तर अजून खूप काही आहे.

जीवनात नेमकं काय चाललंय हे दाखवण्यासाठी आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणात Facebook वापरतोय आता तुम्ही म्हणाल अहो वापरत आहे तर वापरू द्या पण नाही इतक्यावरच तो थांबत नाही एखादा चहा जरी घेतला तरी लगेचच FB वर फोटो,घरी एखादी डिश काय केली लगेचच FB वर पोस्ट जन्मापासून ते मरणापर्यंत अशा लहान सहान सर्व प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टी FB वर आजचा तरुण 100-150 KM वर असलेल्या आपल्या मित्रांना पोस्ट करून सांगत असतो व कशाप्रकारे आपल्या फोटो ला जास्त likes व comment येतील याकडे आज त्याचे जास्त लक्ष लागलेले आहे.

आणि आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे Facebook वर जास्तीत जास्त मित्र जोडणे ही सुद्धा स्पर्धा काही तरुणांमध्ये दिसून येते. यासोबत इन्स्टाग्राम वरही same process कशाप्रकारे लोक आपल्याला फॉलो करतील व आपले फॉलोअर्स कसे वाढतील याच विचारात आजची तरुण पिढी मग्न दिसून येते.

भारतामधील आजचा हा तरुण वर्ग सोशल मीडिया च्या आहारी गेलेला आहे .ज्याप्रमाणे एखाद्या व्यसनाधीन माणसाला ठराविक वेळेनंतर व्यसनाशिवाय राहवत नाही अगदी तसंच हे सोशल मीडिया चे व्यसन केल्याशिवाय किंवा मोबाईल पासून दूर माणसाला आज राहावत नाही.

सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेट हे सर्व घटक माणसाचे व्यसन बनलेले आहेत. भरपूर लोकांना वाटत की या व्यसन्नपासून दूर राहावं किंवा हे व्यसन कमी कराव मात्र असं करण्यापासून ते स्वतः ला सावरू शकत नाही.

सोशल मिडिया, इंटरनेट, मोबाईल ह्या सर्व गोष्टीने जग जवळ आणले आहे हे जरी खरं असलं तरी यामुळे आपल्या माणसांपासून आपण आज दुरावत चाललेलो आहोत हेही तितकंच खरं आहे. कारण, मोबाईल मुळे एकमेकांना भेटायचे टाळले,सोशल मीडिया वर काहीजण इतके व्यस्त झालेत की त्यांना आपल्या जवळच्या व्यक्ती ची विचारपूस करायला वेळ नाही, मुलगा आणि आई वडील यांच्यातील संवाद कमी झाला.

मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटण्यासाठी आतुर असलेले आज व्हाट्सअप्प चे status पाहून समोरच्या किंवा इंटरनेट द्वारे msg करून व्यक्तीची विचारपूस करतात.


    गावातल्या चौका-चौकातील गप्पा तर आज हरवल्याच, नातेवाईक शेजारी पाजारी यांची विचारपूस करणं आदराने नमस्कार करणं तर आज इतिहासात जमा होत चाललंय. जास्त लांब नाही तर एक दशका अगोदर बघा चार चौघात मोबाईल जरी वाजला तरी मोबाईल बंद करून माणूस चार चौघात गोष्टीं सांगायचा कारण तेव्हा मोबाईल पेक्षा माणसाला,माणुसकीला जास्त किंमत होती. गावठाणावर ,चौकात,शेकोटी जवळ तेव्हा दिलखुलासपणे,मनमोकळेपणाने मनमुराद गप्पा व्हायच्या संवाद व्हायचा एकमेकांच्या सुख दुःखाच्या गोष्टी चालायचा मात्र आज या सोशल मीडिया,मोबाईल, इंटरनेट मुळे सर्व गोष्टी हरवल्यात.

माणसाला माणसाची विचारपूस तर सोडा हो पण बोलायला सुद्धा वेळ राहिलेला नाही.


आज, चार-चौघांचा कट्टा जमतो,चौकाचौकात तरुण एकत्र येतात मात्र संवाद होत नाही हो.. जो तो आपल्याच मोबाईल मध्ये काही न काही काड्या करत बसलेला असतो.

शरीराने जवळ असतात मात्र सर्व लक्ष त्या मोबाईल मध्ये असतं, थोडक्यात माणसाच्या गर्दीत देखील आजचा तरुण हरवलेला आहे. कधी कधी विचार करता करता अस वाटतं की जुन्या पिढीतील लोकांची नाळ ही मातीशी जुळलेली होती हल्लीच्या तरुणांची नाळ मात्र इंटरनेट शी जुळळेली असेल म्हणूनच कदाचित सोशल मीडिया चा इतका जबरदस्त प्रभाव त्याच्यावर आहे की ते मोबाईल लाच आपलं जग मानून त्याच खोट्या विश्वात रमत चाललेला आहे. आईवडील, सोयरे-धायरे , नातेवाईक,आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी यांचं देखील त्याला भान राहिलेले नाही.


वाचकांनो,,


सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाईल नक्कीच वापरा हो पण प्रमाणात वापर करा ह्या सर्व घटकांचा आणि सोशल मीडिया च्या बाहेर देखील एक जग आहे याचं भान राहुद्या गड्यांनो जीवन जगण्यासाठी,समजण्यासाठी कितीतरी पुस्तकं,ग्रंथ, साहित्य आहेत या सोबतच जगात आपली काळजी घेणारे आईवडील आहेत नातेवाईक,मिञ मंडळी,गावकरी मंडळी व आजूबाजूचा सौंदर्याने नटलेला हा निसर्ग आहे हे जरा उघड्या डोळ्यांनी बघा आणि आपल्या माणसांना जपा.

मनमोकळ्या गप्पा करा.

आपल्या कोणत्याही संकटात हजारो Facebook Friends, ट्विटर/ इन्स्टाग्राम फॉलोअर्स कदाचित धावणार नाहीत मात्र आपले नक्कीच धावून येतील.

शेवटी इतकंच सांगतो,,,


तरुणांनो…!


माणसाने माणसात असताना माणसात रहावं,

माणसं खिशात घालून मोबाईल हातात वागवू नये.


 लेखक शिवा बाजीराव खंडारे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत