हरवलेली प्रेयसी मैत्रीण ~ शिवा बाजीराव खंडारे
* हरवलेली प्रेयसी मैत्रीण *
शीर्षक वाचून कळेनासं झालं असेल ना ? की प्रेयसी मैत्रीण हे काय नवीन तर थोडं थांबा समोर स्पष्टपणे सांगणारच आहो.तर मी शिवा गेल्या दीड महिन्यापासून कोण्यातरी जवळच्या मैत्रिणीला मनातील वेदना गेल्या 10 महिन्यापासून जीवनात करत असलेला संघर्ष,मनाला बसत असलेले चटके मनमोकळेपणाने सांगावं आणि मनावर असलेल ओझं हलकं करावं अस खूप आतुरतेने वाटतंय पण दुर्दैवाने नशिबात प्रेयसी तर नाहीच शिवाय एक मैत्रीण होती ती सुद्दा आता राहिली नाही.
मित्र तर खूप आहेत हो एकच काय तर 7-8 काळजाचे तुकडे आहेत साले पण मानवी स्वभाव आणि त्यातही हे बाविशी मधील वयच आहे विरुद्ध लैंगिकतेकडे आकर्षित होणं म्हणून मैत्रिणीचा हा अट्टाहास.
आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो की मी थोड्या वेळापूर्वी लिहिलंय की मैत्रीण होती आता राहिली नाही,मैत्री उरली नाही तर आधी होती का ? तर नक्कीच होती एक Bestie तिच्याबद्दल सांगण्यासाठीच हा लेखप्रपंच.
मी एक साधासुधा तरुण एकतरी प्रेयसी असावी या प्रामाणिक मताचा वयाच्या सोळावीपासून तर आता बावीशी संपत आलीय तरी प्रेयसी नाही हे रडगाणे गाणारा. तशा आतापर्यंत आयुष्यात आवडण्याऱ्या 5-6 मुली येऊन गेल्यात पण कुठं जमलं नाही.त्यामधील एक आवडणारी माझी #Crush_मैत्रीण तर तीच नाव घेणं मी टाळतोच
तर झालं असं की मी दहावी Pass होऊन 11 मध्ये विभागीय स्तरावर प्रवेश घेतला आणि Class मधील एक मुलगी आवडायला लागली.आवडायचं कारणही तसच दिसायला सुंदर,लांब कंबरेपर्यंतचे डोक्याचे केस,साधं-सुध राहणीमान म्हणजे पहिल्या नजरेतच मनात घर करून बसणारी होती ती.
ती सुद्धा मेरिट मध्ये आणि मी सुद्धा मेरीटमध्ये होतो
थोडी ओळखी झाल्यावर कळालं की आम्ही एकाच तालुक्याचे आहोत आणि योगा योगाने एकाच Trade मध्ये आता मी साधा सुधा मुलगा Propose करणं तर दूरच Contact Number मागायला देखील घाबरत होतो.पण दिवाळीच्या आधी आधी तिनेच माझा Contact No. घेतला ओळखी वाढत गेली आणि आम्ही घट्ट होत गेलो ती मैत्रीच्या नात्याने बोलायची, व मी; ती मला आवडायची म्हणून बोलायचो. त्यावेळेस रोज सकाळी एकमेकांना text msg करून Morning Wish करायचो,सकाळी 8 ला उठणारा मी तिच्यासाठी पाच साडेपाच ला उठून सुंदर msg शोधून type करून तिला पाठवायचो नंतर कॉल वर बोलायचो बोलता बोलता विषय प्रियकर-प्रेयसी जवळ येऊन पोहोचला.आता माझ्या आयुष्याची वही तर कोरिच होती पण तीची मात्र भरलेली ती सांगायला लागली की "मी 9th पासून Relation मध्ये आहे" हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि फुग्यातून हवा निघावी तशी माझी दैना झाली. पण ती मला आवडायची हे सांगितलं नव्हतं तेव्हाही आणि आताही.तर प्रेयसी मिळवायची आशा तर आता संपली होती चला म्हटलं मैत्रीणच बनवूया तेव्हापासून घट्ट मैत्री जपली आणि मैत्री ही एकट्याला जपता येत नाही तर दोघांना पण जपावी लागते असं घडतही होतं बरेच दिवस चार वर्षे आमची मैत्री अशीच टिकत राहिली निसंकोचपणें.तिला प्रियकर आहे याचा त्रास मला कधी त्रास झाला नाही कारण ती बिनधास्त बोलायची स्वतः हुन मेसेज करायची एकमेकांच्या स्टेटसला रिप्लाय करायचो एवढेच काय तर कीपॅड फोनच्या जमान्यामध्ये तिला तिच्या भावाचा अँड्रॉइड फोन मिळाला तर तिने तिच्या बॉयफ्रेंडला मेसेज न करता मला व्हाट्सअप्प मेसेज केला आणि बोलली याचा आनंद तिला होता आणि मला पण. असं असतानाच ठरवलं चला हिला आयुष्यभर मैत्रिण म्हणून जपूयात.
दिवसा मागून दिवस निघून गेलेत तिची, तिच्या प्रियकराची ची जन्मतारीख माझ्या पाठ झाली.ग्रॅज्युएशन मध्ये आम्ही वेगवेगळे झालो.अधून मधून msg,कॉल व्हायचे त्यामुळे भेटण्याचा विषयच कधी आला नाही एकाच शहरात असून तिने तर कधी भेटायला बोलावलं नाही पण मी बोलावलं तर भेटायला पण सुद्धा आली नाही (अपवाद 1 वेळ ) आता तुम्ही म्हणाल मैत्री घट्ट असल्यावर भेटणं गरजेचं आहे का तर नेहमी नाही पण कधीकाळी एखाद्या दिवसाच्या निमित्ताने,तिचा किंवा माझा वाढदिवस, मैत्री दिवस अशावेळी सुद्धा भेट झाली नाही चला ठीक आहे काही हरकत नाही. समोर वळूया आतापर्यंत ऐकत आलोय की "जिथे फ्रेंडशिप असते तिथे लिमिट नसते आणि जिथे लिमिट असते तिथे फ्रेंडशिप नसतेच" ठीक आहे पण मुलं आणि मुली यांच्या मैत्रीच्या नात्यात लिमिट असावी हे सुद्धा बरोबर आहे आणि मान्यही आहे. बऱ्याच मित्र मैत्रिनींना मी प्रेयसी-प्रियकर सारख वागताना (Normal Behaviur) बघीतलं आहे 2 वेळा मी तिला I love You देखील म्हटलं ( Friendship च्या नात्याने ) पण तिने रिप्लाय मध्ये Love You तर दूरच like you सुद्धा नाही म्हटलं.
गेल्या दीड वर्षांपासून आमच्या मैत्रीमध्ये फक्त औपचारिक नातं राहीलय म्हणजे एखाद्या वेळी क्वचितच बोलण होत ते पण msg केला तर फॉरमॅलिटी म्हणून;आधीसारखं मनमोकळ बोलणच होत नाही आणि हे मी तिच्या कानावर सुद्धा टाकलंय मात्र ती बोलण्याकडे लक्षही देत नाही. या आधी कस म्हणजे इकडंल तिकडंल खूप सार बोलणं आमच्यात व्हायचं विनाकारण सुद्धा आता मात्र माझ्याकडे बोलायला खूप सारं ( एक-दीड महिन्याचं,कारण एक दीड महीना आमचा कॉल होत नाही) असतं पण तिच्याकडे बोलायला काहीच नसतं आणि अधून मधून कॉल केला तर रिसीव करत नाही आणि रिसीव केला तर मूड नाही,कामचच बोल असं म्हणते यापलीकडे बोलतच नाही आणि मुख्य विषय तर मी अजून लिहिलाच नाही. माझं आयुष्य इतकं झंड झालंय की शब्दात व्यक्त करणे कठीणच एकतर प्रेयसी साठी तरसतोय ती मिळाली नाही आणि दुसरीकडे मैत्रीण सुद्धा बोलायला नाही आता योगा योगाने अजून मला प्रेयसी न मिळाल्याने मैत्रीण वरील असलेले अट्रॅक्शन अजूनही कमी झालेले नाही कारण ते इतरत्र Divert करण्यासाठी कोणी मुलगी आयुष्यात आलीच नाही असे घोडे आयुष्याचे लागलेत.ती बऱ्याचदा मला दुसऱ्या मुलीच्या नावाने चिडवते,डीचवते पण तिला कोणी सांगावं की तीसुद्धा माझी Crush आहे.कारण ती सोडून जाऊ नये म्हणून तिला कधी सांगगायची हिम्मतच झाली नाही.
आता गेल्या 3 महिन्या आधीची गोष्ट ( 6 जून 2023 ) वैयक्तिक आणि घरघुती समस्येला कंटाळून मन हलकं करण्यासाठी मी मैत्रिणला 9:45 Pm ला Msg टाकला पण ती Whatspp ला ऑन नव्हती म्हणून लगेच Text केला आणि ऑनलाइन यायला सांगितलं ती ऑनलाइन आली Msg करण्याचं कारण सांगितलं खूप Upset आहे म्हटलं थोडंच बोलणं झालं आणि 10 वाजलेत.आता तिच्या प्रियकराच सांगणंच आहे 10 च्या नंतर कुणाशी बोलायचं नाही हे मला आधीही माहीत होतं पण मला वाटलं upset आहे म्हटलं तर किमान 5-6 मिनिट तरी 10 च्या नंतर शिल्लक बोलेल पण नाही...
10 वाजलेत म्हणे मी म्हटलं खूप upest आहे मी 650 Contact list मधून फक्त तुला msg केला तर काहीही विशेष प्रतिक्रिया न देता सॉरी आणि गुड नाईट म्हणून ऑफलाईन गेली निश्चितच ती दहाला झोपत नाही किंवा रोज दहा लाच ऑफलाईन जात नाही पाच-दहा मिनिटे उशीर सुद्धा होतो मग त्या दिवशी उशीर झाला असता तर काय झालं असतं ? 10 ला ऑफ जाऊन Text msg पण करता आला असता पण नाही.
मी msg करण्याआधी मला थोडी शंका होती की 10 वाजणार आहेत बोलेल की नाही मेंदूने नाही म्हटलं तरीही मी Heart च ऐकून msg केला.
तेव्हा खूप वाईट वाटलं आतापर्यंत बऱ्याच गोष्टी समजून घेतल्यात,मैत्री टिकवायची म्हणून बरच मनाविरुद्ध सहनही केलं पण आता नाही असं म्हणून त्या रात्री काही वेळाने मी आरशा समोर जाऊन माझ्या स्वतः च्या गालांवर 2 चापटा मारल्यात.कारण माझ्या मनाला ती नेहमीच इतरांपेक्षा आपलीशी वाटायची,तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि प्रेयसी पेक्षा जवळची मैत्रीण असते असं वाटायचं त्या सगळ्या गैरसमजाबद्दल त्या दोन चापटा होत्या. खर तर ती एकटीच माझी Bestie होती,कदाचित तिला माझ्यासारखे अजूनही मित्र असतील पण माझ्यासाठी ती एकटीच होती म्हणूनच ह्या अपेक्षा माझ्या मनाला तिच्याकडून असाव्यात.
एकाच शहरात 5 वर्षे सोबत असून कधी तिने स्वतः हुन कधी कोणत्याही निमित्ताने भेटायला बोलावलं तर नाहीच शिवाय 2 वर्षांपासून मी भेटायला बोलावलं तर अभ्यास आहे,आजचा दिवस व्यस्त आहे,इकडे काम आहे वगैरे वगैरे अशा या ना त्या बहाण्याने भेटलीच नाही.
बऱ्याचदा तिने status ला रिप्लाय करावा म्हणून मी तिलाच दिसतील असे status ठेवायचो. काही स्टेटस ला रिप्लाय ची अपेक्षा असतांना सुद्धा मिळाले नाही (अपवाद वगळता ), एवढ्यात तर मिळत देखील नव्हते. 2-3 वेळी अडचणीत असतांना हेल्प साठी कॉल केला तर Help नाही ( शिवाय जुळवाजुळव साठी प्रयत्न सुद्धा नाही) अशा असंख्य कारणांमुळे आता ती माझी आधीची Bestie राहिली नाही असं खेदाने लिहावं लागतंय.Single असल्याचं दुःख सांगत असतांना नेहमी म्हणायची पोरीच्या मागे लागू नको रे अस तस.
मात्र तिला ह्या एकटेपनाच्या भावना काय कळणार कारण वयात येण्या आधीपासूनच Relationship मध्ये असणारी ती तिला काय कळणार...असो
मी मात्र वेडा प्रेमापेक्षा मैत्री Valuable,Lifilong टिकाऊ असते या विचाराने मैत्री जपतच आलो एक वेळेस गार्डन मध्ये पण भेटायला बोलावलं तिला.पण मला काय माहिती गार्डन असो वा नॉर्मल place भेटायला बोलावल्याने फक्त प्रेयसी येत असते,व्यस्त वेळेमधून आपल्याला बोलण्यासाठी थोडा वेळ काढणारी प्रेयसी च असते..
मैत्रीण नाही..! लिहिता-लिहिता अनेक प्रसंग, गोष्टी,किस्से आठवतायत मला आमच्या Friendship चे, एवढंच नाही तर तिने सांगितलेल्या तिच्या लग्नाच्या प्लांनिंग च्या गोष्टी,Account क्लास मधील गमतीचा गोष्टी सगळं काही घर करून बसलय मनात.
ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगावश्या वाटतात,परत अशा गप्पा माराव्यात अस वाटत पण हे ऐकायला तिला वेळ कुठाय शिवाय ती आता स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करण्यात गुंतलीये.हल्ली 2-3 महिन्यापासून तर मी तिला msg करायला सुद्धा घाबरतोय का तर Reply येणार की नाही नाही या भीतीने आला तर ठीक नाहीतर मी स्वतः ला Criticize करणार.आपल्या msg ची किंमत नाही राहिली असं वाटलं की मनावर एक दडपण येत आपोआप आणि हे टाळण्यासाठी मी तिचा कॉन्टॅक्ट No नेहमी नेहमी डिलीट करतोय तो सुद्दा प्रत्येक वेळी डिलीट होतो पण मोबाईल मधूनच. मेंदु मध्ये save आहे त्याच काय ?
आयुष्यभर तिला मैत्रीण म्हणून जपायचं अस ठरवलं होतं, पण एका हाताने कुठं टाळी वाजते का ? मैत्री ची ही भावना समोरच्या माणसात सुद्धा असावी ना.
तिला गमवायची भीती आधी खूप होती आता मात्र ती राहिली नाही कारण आताच ती अविवाहित असून मैत्रीसाठी वेळ देऊ शकत नाही तर लग्न झाल्यावर काय वेळ देणार ह्याच विचाराने....
आता हे सगळं वाचल्यानंतर तुम्ही काहीजण म्हणाल की काही मुलींची मैत्री ही प्रेमापेक्षा चांगली असते भारी असते तर असेलही पण दुर्दैवाने मला अशी मैत्रीन मिळालीच नाही…..
आता एखादा फोनचा स्टोरेज फुल्ल झाल्यावर,Virus जास्त झाल्यावर आपण फोन फेकायचा की रिसेट करायचा.हे वापरकर्त्यांने ठरवावं.
अगदी Same नात्यामध्ये आहे
आता हे नातं रिसेट करायचं की सोडून द्यायचं हे मी तिच्यावर सोडतोय.
कारण माझ्या काळजात गच्चपणे दबलेला आवाज अजूनही म्हणतोय.
Shiva,she Lost You...!
लेखक ~ शिवा बाजीराव खंडारे

मस्त लिहल भाऊ
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवातुम्ही जे लिहले ते बरोबर आहे
उत्तर द्याहटवापण तुम्ही एक वेळा त्या मुलीला
तुमच्या मनातील गोष्ट सागायला
पाहिजे होत..
लेखा द्वारे माझ्या भावना पोहचल्या पण काही विशेष प्रतिक्रिया नव्हती
हटवाभाऊ तुम्ही एकाच बाजू बोलत आहे
उत्तर द्याहटवात्या मुली ची बाजू पण समजुन घ्यायला पाहिजे
ताई,तुम्ही म्हंटलेलं त्या मुलीने लेख वाचल्यानंतर म्हटलं असत तर मान्य करावं लागलं असत.
हटवा